भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी ‘कृष्णकुंज’ येथे राज ठाकरेंची घेतली भेट!

0

मुंबई : भाजप नेते तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी कृष्णकुंज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. विशेषत: राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि मराठा आरक्षण याविषयावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले मराठा आरक्षणाबाबत राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. दिल्लीतही त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात एकाच दिवशी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरक्षणाबाबत चर्चा केली होती. आता त्यांनी मनसेप्रमुख राजे ठाकरे यांचीही भेट घेतली.

यावेळी राज ठाकरे यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तर उदयनराजे यांनी राज ठाकरेंना राज मुद्रा भेट दिली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात कोणीही राजकारण करू नये. कोणाच्या आरक्षणावर गदा येऊ नये. इतर समाजाच्या नेत्यांना जसा न्याय मिळाला तसा मराठा समाजातील नेत्यांनाही मिळायला हवा. शिवाजी महाराजांचा विचार जपायला हवा नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असेही उदयनराजेंनी राज ठाकरेंना सांगितले असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, उदयनराजे भाेसले प्रथमच मनसेप्रमुख राज ठाकरे यांना भेटले आहेत. तब्बल तासभर चाललेल्या या भेटीत अनेक राजकीय प्रश्नांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत राजकीयदृष्ट्या काय करणे शक्य होईल याबाबतही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी काकासाहेब धुमाळ व जितेंद्रसिंह खानविलकर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.