मशिदीत बॉम्बस्फोट, ३३ जणांचा मृत्यू; शुक्रवारच्या नमाज पठणावेळी घडली घटना!

सलग दुसऱ्यांदा अफगाणिस्तानातील मशिदीत बॉम्बस्फोट घडवून आणला आहे

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानातील बल्फ प्रांतामधील मजारशरीफ शहरातील एका मशिदीत मोठा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये २० जणांचा मृत्यू तर ६५ पेक्षा अधिक जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच अफगाणिस्तानातील कुंदुज बॉम्बस्फोटाने हादरले आहे. शुक्रवारी दुपारच्या दरम्यान येथील एका मशिदीत आत्मघाती बॉम्बस्फोट झाला असून, यामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जखमी झाले आहेत.

एएफपी न्यूज एजन्सीने याबाबतचे वृत्त दिले असून, या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्यापपर्यंत कोणत्याही संघटनेनी घेतलेली नाही. एएफपी दिलेल्या वृत्तनुसार, कुंदुज जिल्ह्याचे पोलीस प्रमुख हाफिज उमर यांनी टोला वृत्त वाहिनीली सांगितले की, शुक्रवारी दुपारी येथील मावली सिकंदर मशिदीत बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी मशिदीत अनेकजण होते. काही लोक नमाज पठण करत होते. या बॉम्बस्फोटामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले.

शुक्रवारी दुपारी अचानक मशिदीत बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी मशिदीत काही लोक नमाज पठण करत होते. अचानक बॉम्बस्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं. अनेक लोक सैरावैरा पळू लागले. त्यामुळे अनेकजण जखमी झाले. बॉम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस आणि मदतकार्य पोहचलं.

जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातेय. गतवर्षी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला होता. तेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकजणांना जीव गमावावा लागला.

काबूलमधील स्फोटात दोन मुलं जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये गुरुवारी रस्त्याजवळ झालेल्या स्फोटात दोन लहान मुलं जखमी झाले आहेत. काबूल पोलीस प्रवक्ते खालिद जदरान यांनी सांगितले की, पश्चिम काबूलमधील निर्जनस्थळी रस्त्याच्या शेजारी स्फोट झाला. या ठिकाणचा जवळपासचा परिसर शिया बहुल परिसर आहे. या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.