राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ८ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित, ५६ मृत्यू!

0

लोकराष्ट्र : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट याबाबत अजूनपर्यंत स्पष्टपणे बोलले जात नसले तरी, ज्यापद्धतीने कोरोना बाधितांचे आकडे समोर येत आहेत. त्यावरून राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. बुधवारी ८ हजार ८०७ नवे कोरोनाबाधित समोर आल्यानंतर गुरुवारीही ८ हजार ७०२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असून, स्थानिक स्तरावर कठोर निर्बंध लादण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.

बुधवारी राज्यात ८ हजार ८०७ नवे कोरोनाबाधित आढळून आले होते. गुरुवारी बुधवारच्या तुलनेत कमी रुग्ण समोर आले असले तरी, ८ हजार ७९२ हा आकडा मोठाच म्हणावा लागेल. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी ८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४४ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४९ टक्के एवढे आहे. राज्यात सध्या ३ लाख ५ हजार ७४५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,५२१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात अजून ६४ हजार २६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३ हजार ७४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख १२ हजार ३६७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, गुरुवारी पुण्यात ७६६ रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ नाशिकमध्येही ६०१ नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या स्थानिक स्तरांवर उपाययोजना केल्या जात असल्या तरी, राज्य सरकारकडून मोठा निर्णय घोषित केला जाणार असल्याची भितीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.