IND v/s ENG : धक्कादायक – मोहम्मद सिराजने धरला कुलदीप यादवचा गळा, व्हिडीओ होतोय व्हायरल!

चेष्टमस्करी की पराभवाचा संताप, क्रिकेट चाहत्यांचा सवाल

0

चेन्नई : पहिल्या कसोटी सामन्यात भारताला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. इग्लंड संघाने २२७ धावांनी दणदणीत विजय मिळविला. इंग्लंडच्या या विजयामुळे भारतीय संघावर सर्वत्र टीकेची झोड उडविली जात आहे. तर भारतीय संघाकडून पराभवाच्या अनेक मुद्यांवर मंथन केले जात आहे. याचवेळी सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, व्हिडीओ बघून सर्वांनाच धक्का बसत आहे. होय, ऑस्ट्रेलियातील विजयानंतर चर्चेत आलेला मोहम्मद सिराज  व्हिडीओमध्ये चक्क कुलदीप यादवचा गळा पकडताना दिसत आहे. त्याचे हावभाव बघून हे नक्कीच फ्रेंडली नसावे अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बीसीसीआयकडून याविषयी कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने कुलदीप यादवच्या चाहत्यांकडून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, व्हिडीओमध्ये मोहम्मद सिराज आणि प्रशिक्षक रवी शास्त्री ड्रेसिंग रूममध्ये परतणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढविताना दिसत आहेत. ड्रेसिंग रूममध्ये जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूंची मोहम्मद सिराज पाठ थोपटवित आहे. तर रवी शास्त्रीदेखील ताळ्या वाजवित त्यांचे मनोबल वाढवित आहेत. मात्र कुलदीप यादव समोर येताच मोहम्मद सिराज त्याचा गळा पकडताना दिसत आहे. मोहम्मदचे हावभाव बघता तो खूपच संतापलेला दिसत आहे. व्हिडीओत मोहम्मद सिराज कुलदीप यादवची कॉलर पडकत त्याला जवळ खेचून जणू काही दम देत असावा, असे दिसत आहे. व्हिडीओमध्ये हा सर्व प्रकार काही सेकंदाचाच शुट झाल्याने नेमके काय घडले हे स्पष्ट होत नाही.

दरम्यान, या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली असून मोहम्मद सिराज पराभवाचा संताप तर काढत नसावा ना? असा सवाल नेटिझन्सकडून विचारला जात आहे. तसेच बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, या मालिकेत भारतीय संघाच्या सुमार फलंदाजीमुळे भारताला पराभव पत्कारावा लागला. भारतला विजयासाठी ४२० धावांची गरज असताना भारतीय फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.