विद्यार्थ्यांकडूनच विधी प्रवेशाच्या ऑनलाइन अर्जात चुका, सीईटीचे स्पष्टीकर!

सीईटी : १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान अर्जात दुरुस्ती करण्याची आणखी संधी

0

नाशिक : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माध्यमातून विधी प्रवेशासाठी मागविण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जात तांत्रिक चुका समोर आल्याने, अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले आहेत. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जात दुरुस्ती करण्याची आणखी एक संधी उपलब्ध करून दिली असून, १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान विद्यार्थ्यांना अर्जात बदल करता येणार आहेत.

ऑनलाइन अर्जात अनेक त्रुटी असल्याचे कारण देऊन विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे तक्रारी केल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या गोंधळामागील नेमके कारण व स्पष्टीकरणाचे परिपत्रकच मंत्री उदय सामंत यांच्या निर्दशनास आणून दिले. परिपत्रकात म्हटले की, तीन वर्षांच्या विधी शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८२ पानी माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली होती. या पुस्तिकेत पदवी व पदव्युत्तर पदवीचे गुण कसे भरावे याचे सविस्तर विवरण अत्यंत सुस्पष्टपणे देण्यात आले होते.

त्याचबरोबर पृष्ठ क्रमांक २६ वर विद्यार्थ्यांनी कोणते गुण व टक्केवारी कसे भरावे याचाही खुलासा केला आहे. तसेच डाउनलोड विभागात याबाबतचे काही नमुनेही उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, अशातही विद्यार्थ्यांनी गुण भरताना चुका केल्या आहेत. माहिती पुस्तिका व सूचनांचे पालन न केल्यामुळेच या चुका झाल्या आहेत. आता या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीस म्हणजेच १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान चुका सुधारण्याची संधी देण्यात आली असून, या कालावधीत त्यांना ऑनलाइन अर्ज एडिट करता येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.