आता एका वर्षाच्या आत बसविली जाणार मानवी मेंदूत चमत्कारी संगणक चिप्स

0

लोकराष्ट्र : इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचे मालक एलन  मस्क हे सतत नावीन्याचा शोध घेण्यासाठी ओळखले जातात. . तसेच त्यांच्या स्पेसएक्स कंपनीने अवकाश संशोधन क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. वाहतुकीचा वेगवान पर्याय देणारे हायपरलूप तंत्रज्ञानही त्यांनी विकसित केलेले आहे
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 2016 साली इलॉन मस्क यांनी न्यूरािंलक या न्यूरोसायन्स स्टार्टअप कंपनीची स्थापना केली.  न्यूरािंलकचा उद्देश हा चिपच्या माध्यमातून मानवी मेंदूमध्ये तार नसलेले संगणक बसविणे म्हणजेच अल्ट्रा  हाय बॅण्डविड्थ ब्रेन मशीन इंटरफेस निर्माण करणे हा आहे .
सुरवातीला न्यूरािंलक कंपनीने  तंत्रज्ञान विकसित करताना एका डुकरावर संशोधनात्मक प्रयोग केला. या डुकराच्या मेंदूमध्ये गत दोन महिन्यांपासून छोट्या नाण्याच्या आकाराची संगणक चिप बसवली होती त्यानंतर एका माकडाच्या मेंदूत वायरलेस इम्प्लांट करण्यात आला . या माध्यमातून माकड अप्लाय मेंदूचा वापर करून व्हिडीओ गेम खेळू शकला.
नुकतीच एलन  मस्क यांनी घोषणा केली कि, एका वर्षाच्या आत  मानवी मेंदूला लावली  जाणारी कॉम्युटर चिप तयार करून ती मानवी मेंदूत फिट करण्यात येईल. पुढे ते म्हणाले कि , मनुष्यच्या मेंदूत चिप लावण्याचे काम एक रोबोट करेल  काम एक रोबोट करेल.भविष्यात अर्टिफिशिअल इंटीलिजन्सने मनुष्यावर कंट्रोल मिळवू नये म्हणून मानवी मेंदू कॉम्पुटरशी जोडणे हे गरजेचे आहे असे मस्क यांनी स्प्ष्ट केले .
सविस्तर बोलतांना मास्क यांनी सांगितले कि मानवी डोातून एक तुकडा काढला जाईल आणि  रोबोतद्वारे  हजारो इलेोड्स मेंदूत  सोडले जातील त्यानंतर छिद्रात सुक्षम यंत्रणा बसविल्या जाईल .यामुळे डोक्यावर छोटासा डाग दिसेल. न्यूरािंलक हि कंपनी अत्यंत सूक्ष्म यंत्रणा तयार करण्यात मग्न आहे.

चिपचा वापर अत्यंत सुरक्षित

 – मेंदूत लावले जाणारे डिव्हाईस १ इंचाचे असेल आणि ते अत्यंत सुरक्षित असेल असे एलन मस्क यांनी स्पष्ट केले आहे.

चिपचे मानवी जीवनासाठी फायदे 

  • पाठीच्या कण्याच्या दुखापती, मेंदू विकार, अल्झायमर या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करण्याचे   लक्ष्य आहे.
  • ही चिप म्हणजे मानवी शरीरातील एक प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. या प्रभावी उपकरणांमुळे वास्तवात स्मृतिभ्रंश, नैराश्य व निद्रानाश या समस्यांचे निराकरण होऊ शकते.
  • मेंदूत चिप बसवण्याचे हे तंत्रज्ञान मानवी आजार बरे करण्याचे ध्येय  आहे.
  • मानवी मेंदूशी निगडित असलेल्या आजारांमधून रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यासाठी वापर होईल
  • स्मृती कमी होणे, श्रवणशक्ती कमी होणे, औदासिन्य आणि निद्रानाश यासारख्या आजारांवर उपयोगी
  • मणक्यांच्या आजार असलेल्या लोकांना त्यातून बरं होण्यासाठी ही चिप उपयुक्त ठरू शकते

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.