व्हॉट्स ॲपवर सेंड केलेला मेसेज ७ दिवसानंतरही करता येईल डिलीट, कसा? जाणून घ्या!

व्हॉट्स ॲपने हे नवे फिचर्स आणले असून, त्याचा युजर्सना मोठा लाभ होणार आहे

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा

गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्स ॲप सातत्याने नवनवीन फिचर्स आणून युजर्सना सुविधांबरोबरच सुरक्षा पुरविण्याचं काम करीत आहे. असेच आणखी एक फिचर्स व्हॉट्स ॲफ घेऊन येत असून, सध्या व्हॉट्स ॲपकडून त्याच्यावर काम केले जात आहे. ही फिचर्स सेंड मेसेज डिलीट करण्याची मर्यादा वाढविणार आहे. जेणेकरून चुकून पाठवलेला मेसेज डिलीट करणे शक्य होणार आहे.

WhatsApp फीचर ट्रॅक करणारी वेबसाइट Wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp Delete for Everyone नावाच्या फीचर्सवर टेस्टिंग करत आहे, ज्याची मर्यादा ७ दिवसांपर्यंत केली जाऊ शकते. या फीचरच्या मदतीने युजर्स सेंड मेसेज एक आठवड्यापर्यंत डिलीट करू शकतात.

हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. फीचर कधी लाँच होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सर्व टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर हे फीचर स्टेबल वर्जनसाठी जारी केलं जाईल. Delete for Everyone फीचर युजर्ससाठी अतिशय फायद्याचं ठरतं. एखाद्याला चुकून मेसेज सेंड झाल्यास, तो डिलीट करता येतो. आधी हे फीचर काही मिनिटांपर्यंत मर्यादित होतं. त्यानंतर त्याची मर्यादा एका तासासाठी वाढवण्यात आली. आता ही मर्यादा 7 दिवसांपर्यंत वाढवण्यात येण्यासाठी काम सुरू आहे.

दरम्यान, WhatsApp फीचर्समध्ये आणखी एका ऑडिओ मेसेजबाबतही ऑप्शन देण्यात आला आहे. व्हॉईस नोट्स स्पीड आणखी वाढवण्यात आला आहे. याआधी कंपनीने WhatsApp मेसेज स्पीड वाढवण्यासाठी तीन ऑप्शन दिले होते. सध्या हे फीचर डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. WhatsApp च्या युजर्सना लवकरच आलेल्या ऑडिओ मेसेज स्पीड कस्टमाइझ करता येणार आहे. वेळेअभावी त्यांना मेसेज पूर्णपणे ऐकायचा नसेल, तर ते तो मेसेज वेगाने ऐकू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा चित्रपट पाहत असताना मध्येच येणारी गाणी फास्ट फॉरवर्ड करू शकता करता, तसाच काहीसा हा प्रकार असेल.

WABetaInfo दिलेल्या वृत्तानुसार, ‘WhatsApp व्हॉइस नोटसाठी प्लेबॅक स्पीड हे बटण आणत आहे. हे फीचर iOS वर WhatsApp च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये आलं आहे. परंतु ते अद्याप डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. लवकरच हे फीचर WhatsApp च्या अँड्रॉइड बीटासाठीदेखील लाँच केलं जाईल, अशी अपेक्षा आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.