मॉडर्न हायस्कूल सिडको येथे मराठी राजभाषा दिन संपन्न

ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमातून पुस्तकांशी मैत्री आणि संस्कार व सकस विचारांची,जाणीवांची रुजवात - विश्र्वास ठाकूर

0

नाशिक : आजच्या सोशल मीडियाच्या जगात वाचन कमी होतय का? वाचन संस्कृती कमी होतेय का? यांवर उत्तर म्हणजे पुस्तकांचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रूजवणे आणि त्यातून चांगला माणूस घडवणे, मुलांनी उच्च ध्येयाने प्रेरीत होऊन ज्ञानसाधना करावी व समाजासाठी आदर्श निर्माण करावा, ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमातून संस्कार व सकस विचारांची ,सकस जाणिवांचीं रुजवात होते असे प्रतिपादन ९४ व्यां अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य समन्वयक व मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे सचिव या विश्वास जयदेव ठाकूर यांनी केले.

मॉडर्न माध्यमिक विद्यालय जुने सिडको येथे मराठी भाषा दिनानिमित्त ” ग्रंथपेटी “भेट दि .२७फेब्रुुवारी २०२१ मराठी राज भाषा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे ग्रंथभेटी विश्र्वास ठाकूर, ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे शिल्पकार विनायक रानडे यांच्या हस्ते भेट देण्यात आली विनायक रानडे म्हणाले की ,पुस्तके आपल्याला सकारात्मक जगण्याचा मार्ग सांगतात व ज्ञानाशी मैत्र जोडतात आनंद देतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती . विधाते एल .एन. यांनी केले तसेच शाळेच्या विद्यार्थानी धनश्री ठाकूर हिने शाळेची सखोल माहिती सांगितली , सिध्दी नरवडे हिने मराठी दिनाचे महत्व समजावून दिले , पुर्वा कुलकर्णी हिने कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याविषयी माहिती सांगितली .

शाळेच्या वरंड्यामध्ये विविध कवी कवितांचे प्रदर्शन आयो जित करण्यात आले होते , या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री . अनिल माळी , कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अंजली घाटुळ व द्रोपदा साबळे यांनी केले, आभार प्रदर्शनाचे काम श्री .विधाते मॅडम यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.