Socking: ‘तो’ पोलीस लैगिंक शोषण करीत असल्यानेच, उकळत्या तेलातून हाताने काढलं नाणं

पारधी समाजातील घटनेला वगळे वळण

0

उस्मानाबाद : उकळत्या तेलातून नाणे काढण्यास आपल्या पत्नीला भाग पाडणाऱ्या पतीचा व्हिडीओ गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. मात्र आता या व्हिडीओमागील वास्तव समोर आल्याने, संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही महिला पारधी समाजाची असून, तिला चरित्रसंपन्न असल्याचे सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढावे लागले. याबाबतचा तिचा व्हिडीओ तिच्या पतीनेच शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. बाईला चरित्रसंपन्न सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात घालावा लागतो, तशी पारधी समाजात प्रथाच असल्याचे समोर येत आहे. मात्र या महिलेचे एका पोलिसाने लैंगिक शोषन केल्याने त्याचे पितळ उघडे पाळण्यासाठीच हा व्हिडीओ केल्याचा दावा पीडित महिला व तिच्या पतीने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून, संबंधिताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्यात ही घटना समोर आली. ही घटना जितकी धक्कादायक आहे, तितकीच संवेदनशिलदेखील आहे.  १६ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेमागील कारणे आता समोर येत आहेत. त्या महिलेनेच याबाबतचा खुलासा केला असून, तिच्या पतीला जेलमध्ये टाकण्याची धमीक देऊन तिच्ययावर वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. तिचा पती भाड्याच्या चारचाकी गाडीवर चालक म्हणून काम करतो. ही घटना घडली तेव्हा ११ फेब्रुवारी रोजी माहेरी जाण्यावरून दोघा नवरा बायकोंमध्ये भांडण झाले. त्याच रागातून ती घराबाहेर पडली. परंड्यातल्या खासापुरी चौकात उभी अससताना एक इमत तिला मोटारसायकलवरून जबरीने घेऊन गेला.

त्याने तिला उसाच्या रानात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर एका पोलिसानेही तिचे लैगिक शोषण केले. परंडा येथील एक पोलीस आहे. चार रात्री आणि चार दिवस हा प्रकार सुरू होता. दरम्यान, तिचा नवरा तिला शोधत फिरत होता. सासरवाडीत त्याने तिचा शोध घेतला. १५ फेब्रुवारी रोजी त्या पोलिसांने तिला सोडून दिले तेव्हा याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास दोघा नवरा बायकोला पेट्रोलनचे जाळून टाकू अशी तिला धमकी दिली गेली. त्यामुळे ती घरी आल्यानंतर तिने नवऱ्याला याबाबत काहीही सांगितले नाही. त्याने वारंवार तिला याबाबतची विचारणा केली. त्या दोघांनी तुझ्यासोबत काय केले, हे तो तिला खोदून खोदून विचारत होता. पण पतीला आणि तिला मारून टाकण्याची धमकी दिल्याने तिने काहीच केले नाही, असे म्हणून त्या टाळण्याचा प्रयत्न केला.

अखेर तिची पवित्रता सिद्ध करण्यासाठी तिला उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढावे लागले. यासर्व प्रकारचा व्हिडीओ त्याने शूट करून तो समाजमाध्यमावर व्हायरल केला. या व्हिडीओमध्ये तो तिला नाणे बाहेर काढण्यास सांगतो. ती नकार देते तेव्हा तिला मारहाण करतो. दरम्यान, जेव्हा या प्रकरणी कारवाईची मागणी केली गेली, तेव्हा त्या महिलेने संबंधित पोलिसांचा पर्दाफाश करण्यासाठी पत्नीने आपणास उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच त्याने याबाबतची कुठलीही बळजबरी केली नसल्याचे स्पष्ट केले.

अशी आहे प्रथा

खरं बोलत असलेल्या महिलेने देवाचं नाव घेऊन उकळत्या तेलातून नाणं काढलं तर तिला काही होत नाही. ती खोटं बोलत असेल तर तिला पोळतं व तेलातून जाळ निघतो. असा समज पारधी समाजात आहे. त्यातूनच ठिकठिकाणी असे प्रकार घडत असतात. स्वत:चा व नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून ती खोटं बोलत होती. त्यामुळे तेलातून जाळ निघाल्याचेही दिसून आले.

भावानो, बहिणीनो…

तिचा पती व्हिडीओ तयार करताना म्हणतो की, भावांनो, बहिणींनो मी बायकोला तेलात हात घालायला का लावतोय, हे तुम्हाला सांगतो, आणि पुढील सर्व कथा पारधी भाषेत सांगतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.