कमल हासन यांच्या गाडीवर हल्ला, हल्लेखोर होता दारूच्या नशेत!

तामिळनाडू येथील कांचीपूरम येथे प्रचारासाठी आलेल्या कमल हासन यांच्यावर हा हल्ला झाला

0

कांचीपूरम : सध्या दक्षिण भारतात विधानसभा निवडणुकांचे वारे चांगलेच धुमसत असून, अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला होता. आता तामिळनाडू विधानसभा निवडणुकीकरीत कांचीपूरम भागात गेलेले अभिनेते तथा मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते कमल हासन यांच्या गाडीवर एका व्यक्तीने हल्ला केल्याचे माहिती समोर येत आहे. रविवारी रात्रीच्या दरम्यान, ही घटना घडल्याचे समोर येत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कमल हासन कांचीपूरममध्ये प्रचाराकरिता गेले होते. प्रचार उरकल्यानंतर हॉटेलकडे जाताना एका अज्ञात तरुणाने त्यांच्या गाडीवर हल्ला केला. अचानकच सर्व काही घडल्याने, एकच खळबळ उडाली. मात्र त्या हल्लेखोराबाबत जेव्हा माहिती घेतली तेव्हा तो कमल हासन यांचा चाहता असल्याचे समोर आले आहे. याविषयी मक्कल निधी मय्यम पक्षाच्या नेत्यांनी अधिकृत माहिती दिली आहे.

त्यांच्या मते, या हल्ल्यात कमल हासन यांना कुठल्याही स्वरुपाची दुखापत झाली नाही. मात्र हा हल्ल्यात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. हल्लेखोराने त्यांच्या गाडीचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. जेव्हा या हल्लेखोराची अधिक चौकशी केली, तेव्हा त्याने नशेत हा सर्व प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, तामिळनाडू विधानसभेच्या प्रचाराची धुरा कमल हासन यांच्यावर असून, सध्या ते राज्यातील विविध भागांमध्ये प्रचारसभा घेत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.