महिंद्रा युनियनची त्रैवार्षिक निवडणूक; आठ जागांसाठी ७३ उमेदवार रिंगणात!

0

नाशिक : महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीअंतर्गत युनियनची त्रैवार्षिक निवडणूक येत्या शनिवारी (दि.१३) होत आहे. गेल्या सात वर्षांपासून निवडणूक न झाल्याने कामगारांची नाराजी होती. आठ जागांसाठी ७३ उमेदवार रिंगणात आहेत. यात अध्यक्षपदासाठी सात तर उपाध्यक्षपदासाठी आठ, जनरल सेक्रेटरी पदासाठी आठ, सचिवपदासाठी १५, सहसचिव पदासाठी नऊ, खजिनदार पदाला सात व अ, ब सदस्य पदासाठी १९ कामगारांनी अर्ज दाखल केले आहेत.

प्रत्येक उमेदवार कामगारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. माघारीच्या दिवशी केवळ सहसचिव पदासाठी उभे असलेल्या एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. आठ पदासांठी ७३ उमेदवार असल्याने महिंद्रा युनियनची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे बोलले जाते. महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कामगार संघटनेसाठी शनिवारी सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंत कंपनीतील कॅन्टीनमध्ये मतदान होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सहचिटणीस, खजिनदार, कमिटी मेंबर अ व ब पदासाठी निवडणूक होत आहे. आठ जागांसाठी एकूण दोन हजार ३०० मतदार मतदान करतील.

असे आहेत उमेदवार :
अध्यक्ष : विदयमान अध्यक्ष योगेश चव्हाण यांच्यासह माजी उपाध्यक्ष एन. डी. जाधव, राजेंद्र पवार, माजी सेक्रेटरी सुनील गोडसे, हेमंत नेहते, नरेंद्र पाटील, संतोष रिपोटे.

उपाध्यक्ष : माजी उपाध्यक्ष संजय घुगे, संजय बागूल, संपतराव चुंभळे, एन. एन. देवरे, चंद्रकांत पाटील, अशोक रौंदळ, सुनील ताठे, चंद्रकांत ठाकरे.

सरचिटणीस : पोपटराव देवरे, संजय घोडके, के. जे. जाधव, दत्तात्रय खैरनार, परशुराम कानकेकर, फ्रान्सिस लोंढे, राजेंद्र मोरे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.