Corona Update : राज्यात कोरोनाबधितांची संख्या पुन्हा सहा हजार पार, तर मृत्यूचा आकडाही मोठा!

५ हजार ८६९ रुग्ण कोरोनामुक्त, ५१ रुग्णांचा मृत्यू, परिस्थिती चिंताजनक

0

लोकराष्ट्र : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही दरदिवसाला एक नवा उच्चांकी आकडा घेऊन समोर येत आहे. पुढील काळात राज्यात कोरोनाची स्थिती आणखी बिकट होईल असे चिन्हे दिसू लागल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक प्रमुख शहरांमध्ये नाईट कर्फ्यू सुरू करण्यात आला आहे. तर विनामास्क फिरणाऱ्यांना दंडही आकारला जात आहे. मात्र असे करूनही कोरोनाचा आकडा हा चढाच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात ६ हजार २१८ नवे रुग्ण आढळून आल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. चिंताजनक बाब म्हणजे मंगळवारी राज्यात तब्बल ५१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ टक्के इतका आहे. आजपर्यंत ५१ हजार ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ही आकडेवारी सर्वांसाठीच चिंताजनक आहे.

गेल्या काही दिवसांपर्यंत बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र आता बाधितांची संख्या वाढत असून, बरे होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मंगळवारी राज्यात ६ हजार २१८ नवे रुग्ण आढळून आले असून, ५ हजार ८६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख ५ हजार ८५१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५८,६०,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी आजपर्यंत २१ लाख १२ हजार ३१२ (१३.३२टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७९ हजार २८८ जण गृहविलगीकरणात आहेत, तर २ हजार ४८४ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५३ हजार ४०९ आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्णांची संख्या पाहता राज्यात लॉकडाऊन घोषित केला जाऊ शकतो, याबाबतच्याही चर्चा रंगत आहेत. मात्र लॉकडाऊन घोषित केल्यास त्याचा परिणाम आर्थिक घडी बसविणार होणार आहे. गेल्या लॉकडाऊनचे अनेक दुष्परिणाम समोर आल्याने, पुन्हा लॉकडाऊन नको अशीच भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र त्याचबरोबर जर लॉकडाऊन नको असेल तर नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.