गाफील राहू नका, कोरोना पुन्हा तोंड वर काढतोय, मागील २४ तासाची आकडेवारी वाचून तुम्हाला धक्का बसेल!

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू होतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

0

लोकराष्ट्र : जवळपास सर्वच क्षेत्र खुले केल्याने, कोरोनाचा संसर्ग संपला की काय? अशा अविरभावात लोक वावरत आहेत. मात्र, त्यांचा हा गाफीलपणा धोकादायक ठरू शकतो. मागील २४ तासांची आकडेवारी हे विदारक दृश्य दर्शविणारी असून, लोकांना सावध राहण्याची चेतावणी देणारीच म्हणावी लागेल. शनिवारी हाती आलेल्या या आकडेवारीमध्ये मागील २४ तासात नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे.

राज्यभरात ३ हजार ६११ नवा कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार ७७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. धक्कदायक आणि प्रत्येकाला चिंता करायला लावणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासात ३८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या आता २० लाख १८६ वर पोहोचली आहे.

सध्या विदर्भात कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मुंबईमध्येही रुग्ण वाढत आहेत. नाशिकमध्ये ही काहीशी अशीच स्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यात ३३ हजार २६९ ॲक्टिव्ह केसेसची संख्या आहे. तर आजपर्यंत ५१ हजार ४८९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना उतारणीला लागला होता. कोरोनाची संभाव्य लाट आली नसल्याने, कोरोनाचा जोर ओसरतो, अशीच काहीशी स्थिती होती. मात्र यामुळे लोक गाफील राहू लागल्याने कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. अमरावती जिल्ह्यात आठवडाभरातच पाच टक्के रुग्ण वाढले आहेत. राज्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत हा आलेख घसरत अडीच हजारांपर्यंत आला होता. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच यात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.