Corona Update : राज्यात रविवारी १६ हजारांपेक्षा अधिक आढळले नवे कोराना रुग्ण, ५० मृत्यू!

0

महाराष्ट्र : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने, राज्यावर लॉकडाऊनचे संकट निर्माण झाले आहेत. सर्वात चिंता वाढविणारी बाब म्हणजे मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याने, शासन स्तरावर लॉकडाऊनबाबतचा गांभीर्याने विचार केला जात आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लादले जात आहेत. मात्र अशातही संख्या कमी होत नसल्याचेच चित्र दिसत आहेत. राज्यात रविवारी दिवसभरात १६ हजार ६२० नवे कोरोना रुग्ण आढळूनआले तर, ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दररोज ५० पेक्षा अधिक सरासरीने मृत्यू होत असल्याने, राज्याचा सध्याचा मृत्यूदर २.२८ टक्के इतका आहे. आतापर्यंत राज्यात ५२ हजार ८६१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

दरम्यान, आज ८ हजार ८६१ रुग्ण करोनातून बरे झाले, राज्यात आजपर्यंत एकूण २१,३४,०७२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.२१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७५,१६,८८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,१४,४१३ (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८३,७१३ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ५,४९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२६,२३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.