Corona Update : राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांनी १५ हजारांचा आकडा केला पार, मृत्यूचाही उच्चांक!

राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला घोषणा शक्य

0

महाराष्ट्र : राज्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले असून, परिस्थिती खूपच चिंताजनक बनत आहे. शुक्रवारी राज्यात नव्या रुग्णांनी १५ हजारांचा आकडा पार केल्याने, राज्यात पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात १५ हजार ८१७ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. तर, ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ७२३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१०,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, आज ११,३४४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,१७,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७३,१०,५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,८२,१९१ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४२,६९३ व्यक्ती गृहविलगीकरणा मध्ये आहेत. तर ४ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

कोरोनाची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत असून, कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे झाले आहे. त्याकरिता नागरिकांनी मास्कचा वापर करणे गरजेचे असून, शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यातील स्थिती दिवसागणिक बिघडत असल्याने, सरकारने लॉकडाऊन का घोषित करू नये? असा सवालही उपस्थित केला जात आहे. अशीच स्थिती राहिल्यास पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला लॉकडाऊनची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.