Corona Update : राज्यात आज १५ हजार ५१ नवे कोरोनाबाधित, ४८ रुग्णांचा मृत्यू

0

महाराष्ट्र : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने १५ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित आढळून येत असल्याने, राज्याची वाटचाल लॉकडाऊनकडे सुरू असल्याचे दिसत आहे. सोमवारीदेखील रुग्ण पंधरा हजारांपेक्षा अधिक आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे सरकार आता आणखी कडक निर्बंध लादण्याच्या तयारीत असून, त्याबाबतचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

सोमवारी राज्यात दिवसभरात १५ हजार ५१ करोनाबाधित वाढले असून, ४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर २.२७ टक्के एवढा झाला आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ९०९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज रोजी राज्यात एकूण १,३०,५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.दरम्यान, आज १०,६७१ रुग्ण करोनातून बरे झाले. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २१,४४,७४३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.०७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. दरम्यान, राज्यात सातत्याने रुग्ण वाढत असल्याने, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारकडून कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.