Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, १० हजार १८७ नवे कोरोनाबाधित, ४७ रुग्णांचा मृत्यू

सरासरी ५० च्या संख्येने मृत्यूची दररोज नोंद होत आहे

0

लोकराष्ट्र : लोकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत असल्याने, परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. केवळ रुग्णच वाढत नाहीत, तर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने, नागरिकांना कोरोना या महाभयंकर आजाराला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. शनिवारी राज्यात १० हजार १८७ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर ४७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ टक्के एवढा आहे. तर, आज ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९२ हजार ८९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण आता अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. आज(शनिवार) राज्यात १० हजार १८७ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ टक्के एवढा आहे. तर, आज ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९२ हजार ८९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण २०,६२,०३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.३६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६७,७६,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,०८,५८६ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२८,६७६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर ४,५१४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण ५२ हजार ४४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.