Corona Update : राज्यात गेल्या २४ तासात ६ हजार ११२ कोरोनाबाधित, ४४ रुग्णांचा मृत्यू!

0

लोकराष्ट्र : कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळून येत असल्याने सरकार राज्यात पुन्हा लॉकडाउन करण्याच्या विचाराधिन आहे. गेल्या २४ तासांत राज्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा चक्रावून गेली आहे. मागील २४ तासात ६ हजार ११२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्याच्या काळानंतर प्रथमच एवढ्या संख्येनी रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा २० लाख ८७ हजार ६३२ वर पोहोचला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र आता बाधितांची संख्या वाढली असून, बरे होणाऱ्यांची संख्या घटली आहे. गेल्या २४ तासात केवळ २ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत. तर याच्या तिप्पट संख्येने रुग्ण वाढले आहेत. आजपर्यंत राज्यात ९९ लाख ८९ हजार ९६३ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बेर होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५. ३२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेसची संख्या ४४ हजार ७६५ असुन, आजपर्यंत ५१ हजार ७१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४८ टक्के एवढा आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५५,८८,३२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ८७ हजार ६३२ (१३.३९ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २४ हजार ८७ जण गृहविलगीकरणात आहेत, तर १ हजार ५८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकार पुन्हा एकदा राज्यात लॉकडाउन घोषित करण्याच्या विचारात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.