Video : शिवसेनेला कोणतंही वचन दिलं नव्हतं; गृहमंत्री अमित शहांनी शिवसेनेला ठणकावलं!

0

सिंधुदुर्ग : भाजपने मुख्यमंत्रीपदासह सत्ता वाटपात ५०-५० असे समान सुत्रं निश्चित केले होते, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. ही सर्व बंद दाराआड झालेल्या बैठकीत ठरलं होतं. त्याबाबतचं भाजपने वचन दिल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात होते. मात्र याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी मौन सोडले असून, शिवसेनेला याबाबतचं कोणतंही वचन दिलं नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्ता वाटपाच्या फार्म्युल्यावरून नाराज शिवसेनेने भाजपासोबत युती तोडत काँग्रेसल व राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. मात्र असा कुठला फार्म्युलाच ठरला नसल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.  यावेळी त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर घणाघाती टीका केली.

खासदार नारायण राणे यांच्या लाइफटाइम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, मी भाजपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात निवडणुका झाल्या होत्या. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. पण, त्यानंतर तीन चाकी रिक्षाचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं. तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे. मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं. मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश होता. जे म्हणत आहेत की आम्ही वचन तोडलं. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री नितीश कुमार होणार. आमच्या जागा जास्त येऊनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं,” अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला उत्तर दिलं.

पुढं बोलताना अमित शाह म्हणाले,”हे म्हणत आहे की, एका खोलीत वचन दिलं होतं आणि मी ते वचन दिलं होतं. मी काही खोलीत करत नाही. जे करतो ते सगळ्यांसमोर करतो. डंके की चोट पर करता हूँ. मी कधीही बंद दाराआडील राजकारण केलं नाही. मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे. कुणालाही घाबरत नाही. सगळ्यांसमोर बोलतो. मी असं कोणतंही वचन दिलेलं नव्हतं. वचन दिलं होतं, असं मानलं तरी उद्धवजी तुमच्यापेक्षा अडीचपट मोठा फोटो नरेंद्र मोदींचा वापरू प्रचार करत होते. मोदीजींच्या नावावर मतं मागितली. माझ्यासोबत सभा झाली. मोदीजींसोबत सभा झाली. प्रत्येक ठिकाणी बोललो एनडीएचं सरकार निवडून द्या. फडणवीसजी मुख्यमंत्री होणार. त्यावेळी का नाही बोलले? पण, असं कोणतंही वचन दिलेलं नव्हतं. सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडून सत्तेत बसले. कलम ३७० हटवलं, घाबरत घाबरत म्हणतात आम्ही स्वागत करतो. राम मंदिर बनवण्याचा निर्णय होतो. तेव्हाही मी जाईल… जाणार नाही. काय झालं? आम्ही तर कधीच घाबरलो नाही. भाजपा सिद्धांतासाठी राजकारणात आलेली आहे. राजकारणासाठी सिद्धांत तयार करत नाही. मी शिवसेनेच्या मित्रांना सांगू इच्छितो की, तुम्ही सिद्धांतांसाठी आलेला नाहीत. बाळासाहेब गेले. आता राजकारणासाठी सिद्धांतांची तोडमोड सुरू आहे. पण, महाराष्ट्रातील जनतेला चांगलं माहिती आहे. मी इतकंच सांगू इच्छितो की, आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलं नसते,” असं म्हणत अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.