संजय राऊत यांचे सूचक ट्विट, संजय राठोड राजीनामा देणार?

अधिवेशनापूर्वीच संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो

0

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने, सत्ताधारी महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. त्याचबरोबर सरकारची बदनामी होत असल्याने, शिवसेना आता संजय राठोड यांचा राजीनामा घेणार? हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केल्याने, या चर्चेला आता चांगलेच बळ मिळताना दिसत आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटणार आहेत. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला विरोधक चांगलेच घेरू शकतात. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी अधिवेशनाअगोदर संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास, एकाही नेत्याला अधिवेशनात बोलू देणार नसल्याची भूमिका घेतल्याने, महाविकास आघाडीवर चांगलाच दबाव वाढला आहे. अशात संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल असेच सध्यातरी चित्र दिसत आहे.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चिंता वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून या विषयावरून महाविकास आघाडीसह मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवून दिली होती. बलात्कारी लोकांना सर्व मंत्री पाठीशी घालत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार यांनाही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या ट्विटमुळे संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर शिवसेनेने जवळपास शिक्कामोर्तब केला असावा असेच सूचित होत आहे. त्यामुळे सोमवारी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, असेच काहीसे संकेत मिळत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.