Corona Update : राज्यात रविवारी ८ हजार २९३ नवे कोरोना रुग्ण, तर ६२ रुग्णांचा मृत्यू!

राज्यातील कोरोना रुग्णांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे

0

लोकराष्ट्र : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या गुरुवारपासून सातत्याने राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजारांच्या वर जात आहे. तर ५० पेक्षा अधिकच मृत्यूची नोंद होत असल्याने स्थिती दिवसेंदिवस बिघडतच आहे. रविवारी मागील २४ तासात राज्यात ८ हजार २९३ नवे रुग्ण आढळून आले, तर ६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तरी पूर्वी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या आता रोडावल्याने रविवारी ३ हजार ७५३ कोरोनातून मुक्त झाले आहेत.

सध्या राज्यातील एकूण बाधितांची संख्या आता २१ लाख ५५ हजार ७० वर पोहचली आहे. राज्यातील मृत्यू दर २.४२ टक्के आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.९५ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत २० लाख २४ हजार ७०४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ७७ हजार ८ आहे. आजपर्यंत राज्यात करोनामुळे ५२ हजार १५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १,६२,८४,६१२ नमुन्यांपैकी २१ लाख ५५ हजार ७० नमूने (१३.२३ टक्के) करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३५ हजार ४९२ जण गृहविलगीकरणात असून, ३ हजार ३३२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.