अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा ; विधिमंडळ परिसरात भाजप-काँग्रेस आमनेसामने

इंधन दरवाढीवरून काँग्रेस आक्रमक

0

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले. विरोधकांनी सुरवातीलाच आपला आक्रमक पवित्रा दाखवून दिला होता, तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांचे सर्व मनसुबे परतून  लावण्याचे संकेत दिले होते, त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशानत खडाजंगी अपेक्षित होतीच. पहिल्याच दिवशी त्याचे चित्र बघायला मिळाले. सभागृहाच्या बाहेर काँग्रेसच्या आमादरांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी राज्य सरकारविरोधात सूर आवळला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आक्रमक होताना काँग्रेस नेत्यांनी सायकल रॅली काढली होती. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच  काँग्रेस आणि भाजप आमदार आमनेसामने आले. त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ विधानभवनाजवळीला वातावरण तप्त झाले होते. दरम्यान, काँग्रेस आमदारांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून रॅली काढली होती. तसेच मोदी सरकारचा निषेध करीत इंधन दरवाढीला केंद्रच जबाबदार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.

याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, केंद्रातील मोदी सरकारनेच ज्या पद्धतीने महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे, त्यातून सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे. काँग्रेसच्यावतीने देशभरात विरोध होत आहे. परवा पेट्रोलियम मंत्र्यांनी थंडीमुळे भाव वाढल्याचा जावईशोध लावला. या पद्धतीने वारंवार थट्टा करण्याचा केंद्रातील मोदी सरकारने जो प्रयत्न सुरु केला आहे, लोकांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचं काम सुरु केलं आहे त्याचा विरोध आम्ही करत आहोत, करीत असल्याचे त्यानं स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.