‘असं रेटूनच घ्यायचं असेल तर मग विरोधकांना बसवताच कशाला?’ देवेंद्र फडणवीस संतापले!

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक सुरुवात

0

मुंबई : राज्याच्या अर्थसकंल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र यांनी सत्ताधाऱ्यांना कोडिंत पकडणार असल्याचे अप्रत्यक्षपणे आव्हान दिले होते. तशाच काहीशा अंदाजाच ते अधिवेशानच्या पहिल्याच दिवशी दिसून येत आहेत. त्यांनी आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ला करात, विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याचा घणाघात करीत बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाल्याने, त्यांचा आणखीनच संताप झाल्याचे दिसून आले. त्यांनी गटारोळ घालणाऱ्या सदस्यांकडे बघत ‘ए काय रे…’ असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आम्हाला संधी देतो असं तुम्ही सांगू शकता. पण तुम्ही पाहतच नाही. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ सदस्य आहेत. ते मगापासून बोलण्यासाठी उभे आहेत पण तुम्ही त्यांच्याकडे पाहतच नाही. आमच्या अधिकाराचं हनन होत असेल आणि असं रेटून घ्यायचं असेल तर कशाला बसवता. पाठवा ना बाहेर, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी सत्ताधारी पक्षातील आमदारांना गदारोळ सुरु केला असता फडणवीसांनी त्यांच्याकडे पाहून ‘ए काय रे’ असा उल्लेख करताच अजून गदारोळ सुरु झाला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सभागृहात कसं वागायचं हे शिकवा यांना…आपण विरोधी पक्षाकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही उभे आहोत, आमचा हक्क आहे. आमच्या अधिकारांचं हनन होणार असेल तर आम्ही एक मिनिटं बसणार नाही.’ असेही त्यांनी आक्रमकपणे म्हटले. यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.