…तर जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, दातार जेनेटीक्सचे खुले आव्हान

दातार’चा ५०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याचाही इशारा

0

नाशिक : काेविड-१९ चाचण्यांमध्ये तफावत असल्याचे कारण देत बंदी घातलेल्या दातार जेनेटीक्स प्रयोगशाळाने आमची बदनामी केल्याचे सांगत थेट ५०० कोटींच्या मानहानीचा दावा केला आहे. दातारने या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे सचिव व नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस धाडली आहे.

शासकीय प्रयोगशाळेच्या तुलनेत दातार प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांमध्ये ४४.४५ टक्के तफावत आढळल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दातारमधील कोरोना चाचण्यांवर बंदी घातली. पुढील आदेश येईपर्यंत प्रयोगशाळेने चाचण्या करू नयेत, तसेच आपल्याकडील साधन सामुग्रीची पुन्हा एकदा आयसीएमआरकडून पडताळणी करून घेण्याचे निर्देश मांढरे यांनी दिले.

चाचण्यांवरील बंदीच्या पवित्र्या नंतर दातार व्यवस्थापन आक्रमक झाले आहे. आयसीएमआर व एनआव्हीच्या मार्गदर्शक तत्वांनूसार प्रत्येक अहवालाचे विश्लेषण केले असताना बंदी घातल्याने आमची बदनामी झाल्याचा पवित्रा दातार व्यवस्थापनान घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात प्रयोगशाळेने प्राण्यांचे कोरोना अहवाल दिले का? असाही एक मुद्दा ऊपस्थित केला आहे.

त्यावर दातारने देशातील प्राण्यांमध्येही कोरोनाचे विषाणू आढळल्याचे पहिल्यांदाच समजले असल्याचा टोलाही जिल्हाधिकाऱ्यांना लगावला
आहे. त्यामुळे येत्या दातार विरोधात प्रशासन असा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.