‘आम्ही भिकारी नाहीत’; अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली!

वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी

0

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवून दिली. सत्ताधारी विरोधकांचे ऐकून घेत नसून, ते त्यांच्या हक्काचे हनन करीत असल्याचा आरोप करीत फडणवीस यांनी सभागृहाबाहेर पडण्याचा इशारा दिला. तसेच त्यांनी उमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्यावरून दोघांमध्येही चांगलीच जुंपली होती. राज्यपालांनी १२ सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करून असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्यानंतर त्यास फडणवीस यांनी चांगलाच विरोध केला. ते म्हणाले की, ‘दादांच्या पोटातले ओठावर आले’ हा मराठवाड तसेच विदर्भातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे हल्लाबोल त्यांनी केला.

हेही वाचा : ‘असं रेटूनच घ्यायचं असेल तर मग विरोधकांना बसवताच कशाला?’ देवेंद्र फडणवीस संतापले!

या दोघांमधील शाब्दीक टीकांवरून सभागृहातील कामकाज चांगलेच तापल्याचे दिसून आले. याची सुरुवात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाने झाली. त्याने कामकाज सुरू होताच मराठवाडा, विर्दभातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी ‘विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी वैदानिक विकास महामंडळ घोषित करू’, असं स्पष्ट केलं.

हेही वाचा : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा ; विधिमंडळ परिसरात भाजप-काँग्रेस आमनेसामने

मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच हरकत घेतली. त्यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेताना अजितदादा जे तुमच्या पोटात होतं ते ओठावर आलं आहे. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांसाठी मराठवाडा आणि विदर्भाला ओलीस धरणं योग्य नाही. मराठवाड्यातील लोक हे कदापीही सहन करणार नाहीत. राज्यपाल आणि तुमचं जे काही सुरू आहे. त्याच्याशी या सभागृहाला काहीही घेणं देणं नाही. वैधानिक विकास महामंडळ हा आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. वैधानिक विकास महामंडळ करा किंवा करू नका, ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही मिळवून घेऊच, अशा शब्दात फडणवीस यांनी अजितदादांच्या विधानाचा समचार घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.