गृहमंत्र्यांपाठोपाठ गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनाही कोरोनाची लागण

ट्विट करून दिली माहिती

0

लोकराष्ट्र : काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदाण झाले आहे. सत्तेज पाटील यांननी स्वत:च याबाबतचे ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. तसेच प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की ‘माझी करोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून, माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन’. सध्या सत्तेज पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.