Corona : अकोला आणि परभणीत लॉकडाऊन, पुण्यात रात्रीची संचालबंदी

0

परभणी/अकोला/पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत. काही भागांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहेत. राज्यात ज्या गतीने रुग्ण वाढत आहेत, त्यावरून लवकर राज्यात लॉकडाऊन घोषित केला जाण्याची शक्यता आहे. विदर्भात नागपूरात कोरोनाचा कहर बघावयास मिळत असून, आता त्याचा अकोल्यातही मोठा परिणाम दिसून येत आहे. परिणामी अकोल्यासह मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत कफ्यू लावण्यात आला आहे.

त्याचबरोबर अकोल्यात शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 या वेळेत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे, तर परभणीमध्ये सोमवारी रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रात्री 12 वाजेपासून परभणीमध्ये लॉकडाऊन सुरू होईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. ते म्हणाले की आम्ही परभणी आणि इतर शेजारच्या जिल्ह्यातील जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रकरणात होणारी वेगाने होणारी वाढ पाहता गुरुवारी नागपुरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. नागपुरात १५ते २१ मार्च दरम्यान ‘कडक लॉकडाउन’ सुरू राहणार आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितीन राऊत म्हणाले होते की लॉकडाऊन दरम्यान खासगी कार्यालये बंद राहतील तर सरकारी कार्यालयांमध्ये २५ टक्के कर्मचारी असतील. जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा करणारी दुकाने खुली राहतील. अल्कोहोलची विक्री केवळ ऑनलाइन होईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.