उमाळा घाटात भीषण अपघात; दोन जागीच ठार, पाच गंभीर जखमी

0
जळगाव :  उमाळा घाटात दोन चारचाकी वाहनात अँक्सिडेंट झाला असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला 5 जण जखमी झाले असून मयतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे उमाळा घाटात सुमारे तासभर ट्रॅफिक जाम झाली होती. पोलिसांनी ती सुरळीत केली.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री  साडे अकरा वाजेच्या सुमारास उमाळा घाटात दोन चार चाकी वाहनाचा अँक्सिडेंट झाला. या मध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मयतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलिस स्टेशनचे उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, पोलिस चालक इम्तियाज खान यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले व मदतकार्य केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलीस व जिल्हा रुग्णालायकडून मयत व जखमींचे नावाबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.