आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाबाधित

ट्विट करून दिली माहिती

0

मुंबई : कोरोनाच्या काळात सुरुवातीपासूनच राज्याच्या आरोग्यासाठी धडपड करणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, स्वत: आरोग्यमंत्री टोपे यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, माझी कोरोने चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून, मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

दरम्यान, राज्यात कोरोनाने पुन्हा तोंड वर काढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउनसारखा कठोर निर्णय तर घेतला जाणार नाही, याची नागरिकांमध्ये चिंता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.