पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली प्रथमच प्रतिक्रिया

0

मुंबई : मुळची बिड येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर तिच्या व आणखी काही लोकांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. कारण यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील राज्य वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. ते प्रकरण ताजे असतानाच संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. दरम्यान, संजय राठोड या प्रकरणात दोषी असून, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात असल्याने महाविकास आघाडीचे सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री याविषयी काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी प्रथमच याविषयी प्रतिक्रिया नोंदविली आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘या प्रकरणात चौकशी करण्यात येईल आणि सत्य सर्वांसमोर येईल. ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती करण्यात येईल. या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात येईल. गेले काही दिवस, महिने आपल्या लक्षात आलेलं आहे की एखाद्यास आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तयामुळे असा कोणीही प्रयत्न केला जाता कामा नये आणि सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. या प्रकरणी सत्य लपविण्याचा अजिबातच प्रयत्न केला जाणार नाही. चौकशीअंती जे सत्य आहे, ते समोर येईल.

दरम्यान, विरोधकांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, संबंधितांवर कारवाई करण्यात पोलीस कचुराईची भूमिका घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेनंतर यंत्रणा हलणार काय? हाच खरा प्रश्न आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.