राज्यपालांना विमान प्रवास नाकारला, वाद निर्माण झाल्यानंतर राज्य शासनाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण!

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला जात असल्याचे गुरुवारी दिसून आले. उत्तराखंड, मसुरीला जात असलेल्या राज्यपालांना सरकारी हवाई प्रवेश नाकारल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्याचे झाले असे की, राज्यपाल मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जात होते, मात्र त्यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याने, राज्यपालंना विमानात तब्बल १५ मिनिटे बसल्यानंतर परत राजभवनावर परतावे लागले.

दरम्यान या प्रकरणामुळे भाजप नेते चांगलेच संतापले असून, महाविकास आघाडी सरकार जाणूनबुजून अशाप्रकारचे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले जावे, अशी मागणीही भाजप नेत्यांनी केली आहे. त्याचे झाले असे की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंड, मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोप कार्यक्रमाला निघाले होते.  सरकारी विमानाने ते कार्यक्रमस्थळी पोहोचणार होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याने त्यांना विमानातून उतरून पुन्हा राजभवणान परतावे लागले. या प्रकारानंतर आता राज्यात एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, राज्यपालाचा हा दौरा पुर्वनियोजित होता. त्यामुळे त्यांनी एका आठवड्याभरापूर्वीच मुख्यमंत्री कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता ते सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. त्यानुसार ते वेळेत पोहोचले अन्‌ विमानात बसले. तब्बल १५ मिनिटे ते विमानातच बसून होते, मात्र शेवटपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी दिली गेली नसल्याने त्यांना राजभवणात परतण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली. अखेर राज्यपालांनी खासगी स्पाइस जेटने डेहाराडून गाठले.

राज्य शासनाचे स्पष्टीकरण

दरम्यान, यामुळे राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असल्याने, राज्य शासनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार, दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी  जाता आले नाही. वस्तुत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.