मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर, मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपसा एटीएसकडे

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले स्पष्ट

0

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती प्रसिद्ध उद्योजक यांना काही दिवसांपूर्वी धमकीचे पत्र मिळाले होते. स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ कार त्यांच्या घराबाहेर बेवारस स्थितीत आढळून आली होती. याच कारमध्ये धमकीचे पत्र असल्याने खळबल उडाली होती. मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याची धमकी पत्रात दिली होती. त्यातच या कारचा मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने, या प्रकरणात मोठा गुंता निर्माण झाला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण  महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. त्यामुळे ही कार कोणाची हा मोठा यंत्रणेसमोर निर्माण झाला होता. जेव्हा या कारच्या मालकाचा शोध घेतला, तेव्हा त्यांनी ही कार चोरीला गेल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

दरम्यान, सुरुवातीला मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांची आत्महत्या नसून, हत्या करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. मी जेव्हा त्यांचा मृतदेह पहिला तेव्हा त्यांचे हात मागे बांधले होते. मागे हात बांधून कोणी आत्महत्या करते का? त्याचबरोबर सचिन वाझे आणि त्यांचे टेलिफोन संवाद समोर आहे. त्यामुळे इतके योगायोग होऊ शकतात काय? असा सवाल उपस्थिती करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला जावा अशी मागणी केली.

याबाबत फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री यांच्या बोलण्यात आणि पोलीस जबाबात तफावत आहे. कोणी पोहोचायच्या आत सचिन वाझे कसे पोहोचले? क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? असे प्रश्न उपस्थित केले. फडणवीस यांनी या प्रकरणात एनआयए चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी विधानसभेत केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम आहे त्यामुळे हा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या ‘एटीएस’कडून करण्यात येईल. तसेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.