धक्कादायक : बळजबरीने दारू पाजून तरुणीवर दोन दिवस केला सामुहिक बलात्कार

फार्महाऊसवर केले दुष्कर्म, आरोपी फरार

0

मध्यप्रदेश : एकीकडे महिला सुरक्षिततेकरिता कायदे केले जात असताना, देशात दररोज अंगावर थरकाप उडेल अशा घटना समोर येत आहेत. मध्यप्रदेशातील शाहडोल जिल्ह्यात रविवारी अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. शाहडोल जिल्ह्यातील गदाघाट भागात एका फार्महाउसमध्ये तरुणीला बळजबरीने दारू पाजून तिच्यावर चौघा नराधमांनी सामुहिक बलात्कार केला आहे.

या तरुणीने दारू पिण्यास चौघा नराधमांना विरोध केला होता. मात्र त्यांनी जबरदस्तीने तिला दारू पिण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी १८ आणि १९ फेब्रुवारीला तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची माहिती, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुकेश वैश्य यांनी सांगितले. जैतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या गुन्हा घडला असून, त्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीवर क्रुरकर्म केल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी चारही आरोपीने संबंधित तरुणीला तिच्या घरासमोर सोडून देत पोबारा केला. तिच्या नातेवाईकांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून प्रकरणाला वाचा फोडली. पोलिसांनी सर्वप्रथम पीडित तरुणीला जैतपूर येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील चारही संशयित आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. त्यांना पकडण्यासाठी विविध भागांमध्ये पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती मुकेश वैश्य यांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.