राजस्थाननंतर ‘या’ राज्यातही पेट्रोल शंभरी पार, महाराष्ट्र शतकाच्या उंबरठ्यावर!

0

लोकराष्ट्र : सध्या देशात पेट्रोल दरवाढीने सर्वच राज्य चिंतेत असल्याचे चित्र आहे. दरदिवसाला होणारी दरवाढ वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या १० दिवसांपासून सलग दरवाढ होऊ लागल्याने राजस्थान पाठोपठ आता मध्य प्रदेशातही पेट्रोलने शंभरी पार केली आहे. महाराष्ट्रही शतकाच्या उबरठ्यावर असल्याने, लवकरच शतक गाठेल अशीच काशी स्थिती आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरमागे ३४ पैसे, तर डिझेलच्या दरात लिटरमागे ३२ पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे. 

गेल्या बुधवारी राजस्थानच्या श्रीगंगानगर शहरात पेट्रोलने शंभरी पार केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी मध्य प्रदेशातही पेट्रोल शंभर रुपयांच्या पार गेले होते. मध्य प्रदेशातील अनुपपूर शहरात पेट्रोल १००.२५ तर डिझेल ९०.३५ रुपये डिझेल इतके झाले होते. मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्क यांनुसार इंधनाचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट राजस्थानमध्ये लागू केला जातो व त्यामागोमाग मध्य प्रदेशचा क्रमांक असल्याने दोन्ही राज्यात पेट्रोल शंभरच्या पार गेले आहे.

मध्य प्रदेशात पट्रोलवर लिटरमागे ३३ टक्के अधिक ४.५ रुपये इतका कर आणि १ टक्का अधिभार असून, डिझेलवर प्रति लिटर २३ टक्के अधिक ३ रुपये इतका कर आणि १ टक्का अधिभार लावला जातो. गुरुवारच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे ९६.३२ रुपये, तर दिल्लीत ८९.८८ रुपये इतके झाले आहेत. डिझेलचे दर मुंबई व दिल्लीत अनुक्रमे ८७.३२ रुपये व ८०.२७ रुपये इतके झाले आहेत.

दरम्यान, पेट्रोलचे वाढते दर लक्षात घेता महाराष्ट्रातही लवकरच पेट्रोल शंभरच्या पार जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पट्रोल ९७ रुपयांच्या पार गेले आहे. तसेच ज्या पद्धतीने पेट्रोलच्या दरात भाववाढ होत आहे, त्यावरून पेट्रोल चालू आर्थिक वर्षातच शंभरी पार करेल अशी स्थिती आहे. दरम्यान, या दरवाढीमुळे वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत असून,पेट्रोलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.