अकोला, मुर्तिजापूर, अकोट शहरात लॉकडाऊन ८ मार्चपर्यंत वाढविला

23 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे

0

अकोला : अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला, मुर्तिजापूर, अकोट शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषिथ केले आहे. या शहरांमध्ये २३ फेब्रुवारीपासून लॉकडाऊनचे आदेश दिले असून, हे आदेश ८ मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहेत.

दरम्यान, हे शहरे वगळता तालुक्यातील इतर गावे तसेच तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यात असलेले निर्बंधही ८ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आलेह आहेत. या आदेशानुसार प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने केवळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच तर प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता इतर क्षेत्रासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरु राहतील.

जिल्हात कोरोनाचा कहर सुरूच असून, दर दिवसाला कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे याकरिता आवाहन केले जात आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठीचे २३ फेब्रुवारी रोजी आदेश देण्यात आले होते. आत ते ८ मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.  तसेच शहरात मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करण्यांवरविरोधातही कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्याकरिता एक पथकच तैनात करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.