‘Liger’ ची प्रतिक्षा संपली, या दिवशी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

0

चित्रपट निर्माता करण जोहर याने काही दिवसांपूर्वीच त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. तसेच चित्रपटाच्या नावही जाहीर करताना चित्रपटात असलेल्या स्टारकास्टविषयी त्याने सांगितले होते. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘Liger : साला क्रासब्रीड’ असे असून, चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटाची तारीख समोर आली असून, प्रेक्षकांना फार काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही. 

करण जोहर यानेच याबाबतचे स्पष्टीकरण दिले असून, काही दिवसांपूर्वीच त्याने ट्विटरद्वारे  चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत केली आहे. त्याचा हा बहुचर्चित चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट हिंदीसह तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे करण जोहर यानेच ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामध्ये विजय देवरकोंडा अनोख्या स्टाइलमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये विजय देवरकोंडा फायटरच्या रुपात दिसत आहे. त्यामुळे चित्रपटात त्याचा अंदाज कसा असेल याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अनन्या पांडे हीदेखील या चित्रपटाची मुख्य आकर्षण असणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.