लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख

लष्करप्रमुख मनोज नरवणे येत्या ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे विद्यमान लष्करप्रमुख मनोज नरवणे येत्या ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्ययामुळे लष्करप्रमुखपदी कोणाची नेमणूक केली जाणार? याकडे लक्ष लागून होते. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतला असून, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारतीय लष्काराचे नवे प्रमुख असणार आहेत.

मनोज पांडे यांना डिसेंबर १९८२ मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्समध्ये नियुक्त करण्यात आले होते. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले आहे. आपल्या 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत, लेफ्टनंट जनरल पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, एलओसीवर पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.