तरुणावर बिबट्याचा हल्ला; बांबूच्या फटक्याने पळवून लावले

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील घटना

0
नाशिक : सिन्नर तालुक्यातील दापूरच्या तेलमाथा शिवारात बिबट्याने तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दोघे भाऊ मकाच्या पिकाला पाणी भरत असताना हा हल्ला झाला. मंगेश सुधाकर आव्हाड असे जखमी तरुणाचे नाव आहे. दहा फुटावर असलेल्या भावावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर भगवान आव्हाड याने बांबूचा फटका मारत बिबट्याला पळविले आणि भाऊ मंगेश याचा जीव वाचवला. 
बिबट्यासोबत एका बछड्याचे दर्शन झाले, त्यामुळे ही मादी असावी असा अंदाज आहे. दरम्यान जखमी तरुणावर दापूरच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. त्याच्या छातीवर, तोंडाला व कानाला जखमा झाल्या आहेत. घटनेची वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.वनविभागाने बिबट्याल पकडण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्याबाबतची पाहणी केली. दरम्यान बिबट्याला तातडीने जेलबंद करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे. परिसरात सध्या भितीचे वातावरण आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.