PHOTOS : सुरक्षा कवच भेदत राहुल गांधींची समुद्रात उडी, मासेमारीचाही घेतला आनंद!

0

कोल्लम : मच्छिमारांचे जीवन जवळून पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समुद्रात त्यांच्यासोबत उडी मारली. मच्छिमारांसोबत त्यांनी समुद्रात पोहण्याचा आनंदही घेतला. त्यापूर्वी त्यांनी नावेतून केरळच्या कोल्लम येथील समुद्र किनाऱ्यावर गेले. मासे पकडण्यासाठी मच्छिमार समुद्रात जाळं टाकण्यासाठी उतरले, त्यावेळी राहुल गांधीही पाण्यात उतरले. त्यांनीही मच्छिमारांसोबत मासे पकडले. किनाऱ्यावर येण्याआधी राहुल गांधी हे किमान १० मिनिटं मच्छिमारांसोबत समुद्रात पोहत होते. सुरक्षा कवच भेदत त्यांनी मच्छिमारांसोबत वेळ व्यतित केला. मच्छिमारांचे जीवन कठीण आव्हानात्मक असते. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मच्छिमारांचे जीवन सुलभ करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असे आश्वसनही त्यांनी दिले. पाहा त्यांचे काही फोटोज्‌!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.