Shocking : बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल!

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे शोषण केल्याचा आरोप

0

बेळगाव : राज्यात महाविकास आघाडीच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांचे महिला प्रकरणात नावे आल्यानंतर आता कर्नाटकातही भाजपच्या एका मंत्र्याचा एका तरुणीसोबत लंगट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली असून, या मंत्र्याचे आता मंत्रिपद धोक्यात आले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समो आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता असाच प्रकार बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्याबातीत समोर आला आहे.

बेळगावचे पालकमंत्री असलेले रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये ते एका युवतीसोबत लंगटपणा करताना दिसत आहेत. त्यामुळे नोकरीच्या निमित्ताने जवळीक साधून त्या युवतीवर अत्याचार केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. त्याबाबतच्या काही व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होत असल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीकेच झोड उठवून दिली आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचर केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे.

त्याचबरोबर दिनेश कलहळ्ळी यांनी शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे. यावेळी दिलेल्या तक्रारी दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटले की, ‘रमेश जारकीहोळी यांनी केपीटीसीएलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने २५ वर्षीय तरुणीचे वारंवार लैगिंक शोषण केले आहे. मात्र तिला ही नोकरी देण्यास नकार दिल्यानंतर तिने त्यांच्यातील काही खासगी क्षण रेकॉर्ड केले. त्याचबरोबर नोकरी न दिल्यास ते जाहीर करील अशी धमकही दिली. मात्र रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करताना त्या तरुणीलाच जीवे मारण्याची धमकी दिली.

व्हिडीओ सार्वजनिक केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा तिला दम दिला. हा सर्व प्रकार महिनाभरापूर्वीच झाल्याची माहिती समोर येत आहे. हा संपूर्ण प्रकार बंगळुरुच्या कबॉन पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेलमध्ये घडल्याचेही तक्रारीत म्हटले होते. दरम्यान, पिडीत तरुणीच्या कुटुंबियांनी दिनेश कलहळ्ळी यांच्याकडे याबाबतची तक्रार केल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच तरुणी आणि तिच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असून, त्यांना सुरक्षा दिली जावी अशी मागणीही केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून रमेश जारकीहोळी यांच्यावर टीका होऊ लागल्याने, त्यांनी याबाबतची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, त्या सीडीची चौकशी होऊ द्या. चुक असेल तर मला फाशी द्या, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, रमेश जारकीहोळी यांचे कर्नाटकात मोठी प्रस्थ आहे. पुर्वी काँग्रेसचे नेते म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कर्नाटकात भाजपची सत्ता आणण्यासात त्यांचा मोठा वाटा असल्याचे बाेलले जाते. मात्र आता सीडी प्रकरणामुळे भाजप त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, हे प्रकरण संवेदनशील असल्याने गुन्हा दाखल करण्यापूर्वी आम्ही अंतर्गत चौकशी करू असे उत्तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र या प्रकरणावरून विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने, कर्नाटकात सीडी प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.