सैफ अली खानच्या छोट्या नवाबचे आगमन ; सैफीनाला पुन्हा पुत्ररत्न, तैमुर झाला दादा!

0

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली असून, तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. वांद्र इथल्या ब्रीज कॅण्ड रुग्णालयात सकाळच्यावेळी तिने मुलाला जन्म दिला. सैफ अली खान आणि करिना कपूर या दाम्पत्याला दुसऱ्यांदा पुत्ररत्न झाले आहे. शनिवारी रात्री करिनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी करिनाने बाळाला जन्म दिला. दरम्यान, आई आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

फेब्रुवारी महिन्यात सैफ अली खानच्या छोट्या नवाबचे आगमन होणार असल्याने सैफीनाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. कित्येक चाहत्यांनी करिनाच्या घरी भेट म्हणून खेळणीदेखील पाठवून दिली होती. चाहत्यांची ही प्रतिक्षा अखेर संपली असून, या दाम्पत्याला पुत्ररत्न झाल्याची गोड बातमी त्यांच्यापर्यंत पोहचली आहे.

तैमूरनंतर करीना दुसऱ्यांदा आई झाली आहे. गरोदरपणाची बाचतमी दिल्यापासूनच करीना कपूरची सोशल मीडियावर सतत चर्चा होती. करीना कपूरच्या बाळाच्या आगमनाच्या बातमीकडे सगळ्यांचेच लक्ष होते. सोशल मीडियावर करीना कपूर तिच्या गरोदरपणातील हटके लूकने कायम ट्रेण्डमध्ये पाहायला मिळाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.