IND v/s ENG : इंग्लडने उभारला धावांचा डोंगर, पाचशेपार मजल!

0

पहिल्या दिवशी वर्चस्व गाजविणाऱ्या पाहुण्या इंग्लड संघाने दुसऱ्या दिवशी धावांचा डोंगर उभा करीत भारतासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. भारताविरूद्धच्या पहिल्याच कसोटी सामान्यात दुसऱ्या दिवसअखेर इंग्लडने ८ बाज ५५५ अशी दमदार धावासंख्या उभारली आहे. यामध्ये जो रूटने कर्णधाराला साजेशी दमदार अशी द्विशतकी खेळी केली आहे. त्यास डॉम सिबली, बेन स्टोक्स यांनी चांगली साथ देत मोठी धावसंख्या उभारली आहे.

दरम्यान, कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील सुरुवातीच्या दोन्ही सत्रावर इग्लंडने पूर्णपणे वर्चस्व गाजविले. भारतीय गोलंदाजांना कुठलीही संधी न देता इंग्लडच्या फलंदाजांनी धावफलक हलता ठेवला. त्यानंतर शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना काहीसे यश मिळाले. पण एकाबाजुने रूटने दमदार खेळी केल्याने दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने मोठी मजल मारलीआहे. जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात केली. पहिल्या सत्रात या दोघांनी ९२ धावांची भर घातली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात स्टोक्सने अर्धशतक तर स्टोक्सने दीडशतक ठोकलं. बेन स्टोक्स फटकेबाजी करत असताना झेलबाद झाला. त्याने १० चौकार आणि ३ षटकार खेचले.

रूटने मात्र लय कायम राखत द्विशतक झळकावले. १००व्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. रूट १९ चौकार २ षटकारांसह २१८ धावांवर बाद झाला. त्यानंतर पोप (३४), बटलर (३०) हे झटपट बाद झाले. त्यानंतर डॉम बेस (२८) आणि जॅक लीच (६) यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला. त्याआधी, नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स ६० चेंडूत ३३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्सदेखील शून्यावर बाद झाला. त्याला बुमराहने पायचीत केले. पण त्यानंतर जो रूट आणि सिबलीने २०० धावांची भागीदारी केली. सिबली ८७ धावांवर पायचीत झाला आणि पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.