मराठा समाजाचा विकास करण्याची मानसीकता महाविकास आघाडी सरकारची नाही : करण गायकर

0

जालना :अंबड येथे राज्यस्तरीय मराठा समाजाच्या बैठकीमध्ये छावा क्रांतिवीर सेनेचे करण भाऊ गायकर यांनी आपली भूमिका मांडली.  साष्ट पिंपळगाव येथे दहा दिवसापासून चाललेले आंदोलन आणि 5 दिवसापासून सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण त्यामध्ये 65 वर्षीय आजी बाई  उपोषणाला बसल्या आहेत. त्यावेळी महाविकास आघाडी सरकार मधील आमदार खासदार यांच्या घरातील कोणी असे उघडयावर झोपले असते का ?

असा खोचक टोला त्यावेळी लावला त्याबरोबर  या सुद्धा आपल्याच माता बघिणी आहेत मा जिजाऊ चा वारसा घेऊन संपूर्ण समाजासाठी मराठा आरक्षणाचा लढा लढत आहे. या मध्ये काही बरे वाईट घडले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडी सरकार ला परवडणार नाही. मुळात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या मंत्री मोहदया कडे आहे त्या खात्याचे मंत्री ओबीसी साठी मोर्चे काढतात.  परन्तु आपण मंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळी सर्व समाजाच्या प्रश्नबाबत घेतली मग जबाबदार मंत्री असताना  गायकवाड आयोग बोगस असल्याचे म्हणूच कसे शकतात.

यावरून  सिद्ध होते की राज्य सरकार ला  मुळात मराठा समाजाला आरक्षण देयचेच नाही. मुळात मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्या सरकार ला मान्य करायच्या नाही मराठा आरक्षण  न्यायप्रविष्ट आहे  परंतु सारथी, सारथी तारादूत प्रकल्प ,अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसतिगृह असेल या मागण्या  तर सरकारच्या हातात आहे. या मागण्या का पूर्ण  होत नाही. एकीकडे सारथी ला निधी देता ,महाज्योतीला ला निधी देतात मग महाज्योती मध्ये ज्योतिदुत,सवित्रीदूत चालतात मग सारथी मध्ये तारादूत का नको. सारथी मधील  सर्व प्रकल्प बंद  केले. त्याच प्रकारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल यामध्ये नको त्या अटी घालून कर्ज मिळूच नाही.

अशी व्यवस्था करून ठवली त्यामुळे निधी असून त्याचा उपयोग काय?  कुठला प्रस्तावच मंजूर होत नाही.  अशी दुटप्पी भूमिका महाविकास  विकास आघाडी सरकारची आहे. त्यामुळे सरकार ने सरकार च्या हातातील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात नसता ही शांतता वादळा पूर्वीची शांतता आहे. आणि ही शांतता कधी उग्र रूप धारण करेल हे सांगता येणार नाही. म्हणून मराठा समाजाच्या उपसमिती चे अध्यक्ष यांनी आंदोलकांची तात्काळ भेट घेऊन काहीतरी तोडगा काढावा.असे मत करण गायकर यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.