सख्ख्या बापानेच केला लेकीवर बलात्कार; विद्येच्या माहेरघरातील घटनेने महाराष्ट्र हादरला!

पीडित मुलीने कशीबशी सुटका करून घेत पोलिसात धाव घेतली

0

पुणे : प्रतिनिधी 

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषत: महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असून, गेल्या काही काळापासून ज्याप्रकारच्या घटना समोर येत आहेत, त्यावरून पुण्यात खरंच कायदा-सुव्यवस्था आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान, पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. होय, सख्ख्या बापानेच पोटच्या पोरीचे लैगिंक शोषण केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी नराधम पित्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पित्याचे वय ५१ इतके आहे. तर पीडित तरुणीचे वय १९ आहे. मिळाळेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आणि तिचे वडील असे दोघेच घरात होते. त्यावेळी आरोपी नराधम पित्याने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले.

तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीने कशीबशी आपली सुटका करून घेतली. तिथून सुटका केल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली. तसेच घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. अखेर चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी नराधम पित्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.