‘सबका साथ, सबका विकास’ योजनेअंतर्गत मोदी सरकार १ लाख खात्यात पाठविणार, असा मेसेज आला असेल तर सावधान!

एका मॅसेजमध्ये म्हणे मोदी सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या योजनेअंतर्गत सर्व लोकांच्या खात्यात १ लाख रुपये ट्रान्सफर करणार आहे.

0

मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून लोकांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याच्या विविध अफवा पसरविल्या जातात. निवडणूक काळात सर्वसामान्यांना वेगवेगळे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारच यास कारणीभूत असून, आता एक नवी अफवा समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे. व्हॉट्स ॲपवर फिरत असलेल्या एका मॅसेजमध्ये म्हणे मोदी सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या योजनेअंतर्गत सर्व लोकांच्या खात्यात १ लाख रुपये ट्रान्सफर करणार आहे. मात्र नेहमीप्रमाणे हाही मेसेज पूर्णत: चुकीचा असून, त्याकडे नेटीझन्सनी दुर्लक्ष करणे गरजेचे आहे.

भारत सरकारची संस्था असलेल्या पीआयबीने या व्हायरल मेसेजमागील सत्यता पडताळून पाहिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करून याबाबत माहिती देत लोकांना सतर्क केले आहे. तसेच या मेसेजमधील सर्व दावेही पीआयबीने फेटाळले आहेत. सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नसून, लोकांना त्यास बळी पडू नये असे आवाहनच पीआयबीने केले आहे. तसेच हा दावा पूर्णत: खोटा असल्याचेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, व्हॉटस्‌ ॲपवर जो मेसेज व्हायरल होत आहे, त्यामध्ये एक मोबाईल क्रमांकही देण्यात आला आहे. ७६८२००८७८९ असा हा क्रमांक असून, ट्रुकॉलरवर सर्वच केल्यास हा नंबर नरसिंह रंधारी या नावे दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार हा क्रमांक ओडिसामधील असून, कोणत्यातरी भामट्याने लोकांना गंडविण्याच्या हेतूनेच हहा सर्व खटाटोप केला असावा असे आता स्पष्ट झाले आहे. दररम्यान कोणाला याविषयी काही शंका असल्यास त्यानी https://factcheck.gov.in/ ययाठिकाणी किंवा ९१८७९९७११२५९ या व्हॉट्‌स ॲप क्रमांकावर किंवा pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करून तुमच्या शंकांचे निरसन करून शकता. ही सर्व माहिती पीआयबीच्या अधिकृत वेबसाइट https://pib.gov.in वर देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.