लाल किल्ला हिंसाचार : फरार दीप सिधूच्या अटकेनंतर, इकबाल सिंगला अटक, पन्नास हजाराचे होते बक्षिस!

0

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी पंजाबी चित्रपट अभिनेता दीप सिधू याला अटक केल्यानंतर आता याप्रकरणी संशयित आरोपी इकबाल सिंगलाही अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने हि कारवाई केली आहे. इकबाल याच्याबद्दल माहिती सांगणाऱ्यांना ५० हजारांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. मंगळवारी मुख्य आरोपी दीप सिंधूनंतर लगेचच इकबाल सिंग यालाही अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेषश शाखेच्या पथकाने दीप सिधूला कर्नाल बायपासवर सोमवारी रात्री १०.४० वाजता अटक केली होती. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यात एका संप्रदायाचा आणि संघटनेचा झेंड फडकवण्याच्या घटनेतील तो आरोपी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. मात्र अशातही सोशल मीडियावर तो सातत्याने व्हिडीओज्‌ आणि मॅसेजेस करत होता. आपल्या चिथावणीखोर भाषणांनी आणि स्टारडमद्वारे युवकांना तो चिथावत होता.

सिद्धूला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकांनी काही दिवसांपासून पंजाबमध्ये अनेक ठिकाणी सापळा लावलेला होता. त्याला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त संजीवकुमार यादव यांनी सांगितले की, आम्हाला सिधूबाबत काही माहिती मिळाली होती. तो कर्नाल येथून पळून जाण्यासाठी कुणाची तरी प्रतिक्षा करत आहे, असे कळले होते. त्याचवेळी त्याला पकडण्यात आले. प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिसाचारात ५०० पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. तर एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, पोलीस या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध घेत आहेत. गेल्या आठवड्यात दीप सिधू याच्यासह गुरजोतसिंग आणि गुरजंतसिंगची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयाचे बक्षिस देण्याची घोषणा पोलिसांनी केली होती. सीसीटीव्ही फुटेज व मोबाइल रेकॉर्डिगंच्या साह्याने इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.