आयपीएलच्या लिलावात ‘या’ देशाच्या क्रिकेटपटूवर सर्वाधिक बोली, वाचा कोणत्या संघाने कोणाला घेतले विकत

0

लोकराष्ट्र : आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठीची लिलावप्रक्रिया पार पडली असून, यामध्ये आयपीएलच्या इतिहासात खेळाडूंवर विक्रमी अशी बोली लावण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिसन या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरला. मॉरिसनला राजस्थान संघाने तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांमध्ये विकत घेतले आहे. याआधी सर्वाधिक १४ कोटींची बोली भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंगवर लावण्यात आली होती. त्यामुळे युवराजचा हा विक्रम मॉरिसनने मोडीत काढला आहे. 

त्याव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, जाये रिचर्डसन या विदेशी खेळाडूंनी देखील कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. चेन्नईतील हॉटेल आयटीसी ग्रॅण्ड छोला येथे ही लिलावप्रक्रिया पार पडली. या संपूर्ण लिलावप्रक्रियेतत अष्टपैलू खेळाडूंचेच सर्वाधिक वर्चस्व दिसून आले. दक्षिण आफ्रिकेसह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांच्या खेळाडूंना संघमालकांनी सर्वाधिक पसंती दिली.

राजस्थान रॉयल्स :ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्तफिजूर रहमान, लिआम लिव्हंगस्टोन, कुलदिप यादव, के.सी. करिअप्पा, आकाश सिंग, चेतन साकारिया.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, मोहम्म अझरुद्दीन, डॅन ख्रिस्टियन, सचिन बेबी, सुय़स प्रभुदेसाई, के. एस. भरत, रजत पाटिदार

पंजाब किंग्ज : जाय रिचर्डसन, रायले मॅरेडिथ, मोझेस हेन्रिक्स, डेव्हिड मलान, शाहरुख खान, सौरभ कुमार, उत्कर्ष सिंग, फॅबिअन अॅलन, जलज सक्सेना

चेन्नई सुपर किंग्ज : मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, सी. हरी निशांत, एम. हरिशंकर रेड्डी, के. वर्मा

मुंबई इंडियन्स : अर्जुन तेंडुलकर, अॅडम मिल्ने, नॅथन कोल्टर नाइल, पियुष चावला, जिमी निशम, युधवीर चरक, मार्को जान्सेन

दिल्ली कॅपिटल्स : स्टीव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, रिपल पटेल, विष्णू विनोद, उमेश यादव, लुकमन मेरिवाल, एम. सिद्धार्थ

सनरायजर्स हैदराबाद : मुजीब उर रेहमान, केदार जाधव, जगदीश सुचिथ

कोलकाता नाइट रायडर्स : शाकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, पवन नेगी, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नाय, व्यंकटेश अय्यर.

या खेळाडूंवर सर्वाधिक बोली

चेन्नई सुपरकिंग्ज : के. गौतम 9.25 काेटी,  मोईन अली 7 काेटी, पुजारा 50 लाख, एम हरिशंकर 20 लाख, के भगत वर्मा 20 लाख
सी हरी निशांत 20लाख.
दिल्ली कॅपिटल्स : स्टीव्ह स्मिथ 2.20 काेटी, उमेश यादव 1 काेटी, रिपल पटेल 20 लाख, विष्णू विनोद 20 लाख, मेरीवाल 20 लाख, एम. सिद्धार्थ 20 लाख, टॉम करेन 5.25 काेटी, सेम बिलिंग्ज 2 काेटी.
केकेआर :  शाकिब 3.20 काेटी,  शेल्डन जॅक्सन 20 लाख, वैभव अरोरा 20 लाख, बेन कटिंग 75 लाख, करुण नायर 50 लाख, हरभजन सिंह 2 करोड़, पवन नेगी 50 लाख, वेंकटेश अय्यर 20 लाख.
मुंबई इंडियन्स : ॲडम मिल्ने 3.20 काेटी, कुल्टर नाइल 5 काेटी, पीयूष चावला 2.40 काेटी, जिमी निशम 50 लाख, युद्धवीर चरक 20 लाख
मार्को जेनसन 20 लाख, अर्जुन तेंडुलकर 20 लाख.
पंजाब किंग्ज : रायली मेरिडिथ 8 काेटी, शाहरुख खान 5.25 काेटी, रिचर्डसन 14 काेटी, डेव्हिड मलान 1.5 काेटी,  हेरीक्वेंस 4.20 काेटी, उत्कर्ष सिंह 20 लाख, जलज सक्सेना 30 लाख, फेबियन एलन 75 लाख, सौरभ कुमार 20 लाख. 
राजस्थान रॉयल्स : शिवम दुबे 4.40 काेटी, ख्रिस मॉरिस 16.25 काेटी, मुस्तफिजुर 1 काेटी, सकारिया 1.20 काेटी, कुलदीप 20 लाख
आकाश सिंह 20 लाख,  लिव्हिंगस्टोन 20 लाख, केसी करियप्पा 20 लाख.
आरसीबी : सचिन बेबी 20 लाख, रजत पटीदार 20 लाख, मो. अझरुद्दीन 20 लाख, मॅक्सवेल 14.25 काेटी, जेमिसन 15 काेटी, क्रिस्टियन 4.80 काेटी, प्रभुदेसाई 20 लाख, केएस भरत 20 लाख. 
सनरायझर्स हैदराबाद : जगदीश सुचित 30 लाख, केदार जाधव 2 काेटी, मुजीब 1.5 काेटी. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.