IPL 2022 : चेन्नईचा सलग चौथा पराभव; हैदराबादचा दणदणीत विजय!

चेन्नई संघ अजूनही विजयासाठी चाचपडत असल्याचे दिसून आले

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये ट्रॉफीच्या रेसमध्ये असणारा संघ चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या सीझनमध्ये मात्र एका विजयासाठी अक्षरश: झुलावे लागत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १७ व्या सामन्यात चेन्नईला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईचा हा सलग चौथा पराभव ठरला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने तब्बल ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादकडून अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी करीत विजय सोपा केला. त्याने ७५ धावांची खेळी केली.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने हैदराबाद संघासमोर १५४ धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने दिलेल्या लक्ष्याचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन या जोडीने जबरदस्त सलामी दिली. दोघांनीही ८९ धावा जोडत हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. दोघेही विजयाच्या दिशेने घौडदौड करीत असताना १३ व्या षटकात विल्यम्सन माघारी परतला. त्याने ४० चेंडूत ३२ धावा केल्या. दुसरीकडे अभिषेक शर्माने मात्र फलंदाजीत सातत्य ठेवले. त्याने ५० चेंडूत ७५ धावा चोपल्या. यात त्याने ३ षटकार आणि ५ चौकार  लगावले. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी निकोलस पूरन फलंदाजीसाठी आला.

शेवटी हैदराबादने आठ गडी राखून चेन्नईवर विजय मिळवला. तर शेवटी राहुल त्रिपाटी (३९), निकोलस पूरन (५) नाबाद राहिले. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मात्र पुन्हा एकदा दोघेही अपयशी ठरले. हे दोघे बाद झाल्यानंतर मैदानावर उतरलेल्या मोईन अलीने चांगली खेळी केली. त्याने १३ चेंडूमध्ये तीन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने ४८ धावा केल्या.

त्यानंतर चौथ्या विकेटसाठी आलेला शिवम दुबे फक्त तीन धावा करु शकला. तोही टी नटराजनच्या चेंडूवर झेलबाद झाला. रविंद्र जाडेजाने २३ धावा करुन संघाला १५४ धावांपर्यंत जाण्यासाठी मदत केली. धोनी अवघ्या तीन धावा करुन शकला. तो मार्को जानसेनच्या चेंडूवर झेलबाद झाला. तर डीजे ब्राव्हो (३), ख्रिस जॉर्डन (६) नाबाद राहिले. वीस षटकांत चेन्नईने १५४ धावसंख्या उभारली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.