मंत्री संजय राठोडविरोधात भाजप महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

आमदार सीमा हिरे समवेत १७ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले

0
नाशिक : पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या संदर्भात  वनमंत्री संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप वरून राजीनामा दयावा या मागणीसाठी  भाजपा महिला मोर्चातर्फे सिडकोतील त्रिमुर्ती चौकात  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी आ. सीमा हिरे सह सतरा भाजपा महिलांना ताब्यात घेऊन सोडुन दिले.
 वनमंत्री राठोड यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता त्रिमुर्ती चौक  सिडको  येथे चक्का जाम आंदोलन आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी व सदस्यांनी सरकार विरोधात घोषणा देण्यात आले. या आंदोलनात  रोहिणी नायडू, नगरसेविकस अलका अहिरे, नगरसेविका भाग्यश्री  ढोमसे, भाजपा शहर चिटणीस व नगरसेविका  छाया देवांग, संध्या कुलकर्णी, रश्मि हिरे, मंजुषा दराडे, पुर्वा सावजी,शिल्पा पारनेरकर अर्चना दिडोरकर तसेच भाजपा महिला पदाधिकारी सहभागी झाले  होते. या वेळी अंबड पोलिसांनी आ. सीमा हिरे सह सतरा महिलांना ताब्यात घेऊन सोडुन दिले. या वेळी सहायक पोलिस आयुकत अशोक नखाते याच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.