सर्वसामान्यांना महागाईचे चटके, डाळी कडाडल्या, खाद्य तेलाचा भडका

किचनचे गणित कोलमडले; गॅसच्या किंमतीचाही फटका

0

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महागाई उच्चांकी स्तर गाठत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले आहे. पेट्रोल-डिझेल अन‌ घरगुती गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने, काटकसर करूनही खिशाला मोठी झळ बसत आहेत. अशात आता डाळी अन खाद्यतेलाच्या दरांमध्ये वाढ होऊ लागल्याने, सर्वसामान्यांना महागाईचे चांगलेच चटके सोसावे लागत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून डाळीच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागी चार महिन्यांमध्ये बहुतांश डाळीच्या किंमतींमध्ये किलोमागे ८ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. त्याव्यतिरिक्त खाद्यतेलाच्याही किंमती सातत्याने वाढत आहेत. वर्षभरापूर्वी ७५ ते ८० रुपयाला विकले जाणारे काद्यतेलाचे पाऊच १३५ ते १६० रुपयांपर्यंत विकले जात आहे. मसाल्याच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्याने, सर्वसामान्यांचे मासिक किराण्याचे गणित बघिडले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून कुठलेच प्रयत्न होत नसल्याने, सर्वसामान्य महागाईच्या आगीत होरपळत आहेत.

दरम्यान, कोरोनाचे सावट वाढू लागल्याने, इतर राज्यातून डाळीच्या आयातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण वाहतुक व्यवस्थेचा खोळंबा होत असल्याने, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुढील काळात डाळी, खादयतेल, मसाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अशा आहेत वाढलेल्या किंमती

तेल – १४० ते १६०
तुरडाळ – ११०
हरभराडाळ – ७०
मुगडाळ – ११९
उडीदडाळ – ११०
मिरची २५० ते ३५०
हळकुंड १६०
खोबरे १८०
खडा मसाला – ७५० ते १०००
शेंगदाणे – १२०

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.